Ad will apear here
Next
१९-२० ऑक्टोबरला पिंपरीत आयुर्वेदातील संशोधनावरील आंतरराष्ट्रीय परिषद
पिंपरी : पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्रात ‘आयुर्वेदातील संशोधन’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन १९ व २० ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे. 

डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय, इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ आयुर्वेद व ‘आयएमएव्हीएफ, नेदरलँड’ यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. वेगवेगळ्या देशांतील आरोग्यातज्ज्ञ, संशोधक, विद्यार्थी असे एकूण ४००हून अधिक जण परिषदेत सहभागी होणार आहेत. 

आयुर्वेदातील संशोधनाचा प्रचार व प्रसार व्हावा, आयुर्वेदात नवनवीन संशोधन करण्यास गती प्राप्त व्हावी, तसेच या क्षेत्रात नवपिढीचे योगदान वाढावे आणि गुणवत्तापूर्ण संशोधन कार्य घडावे, या प्रमुख उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन १९ ऑक्टोबर २०१९ रोजी सकाळी साडेअकरा वाजता डॉ. के. एस. धीमान (डायरेक्टर जनरल, सीसीआरएएस, नवी दिल्ली) यांच्या हस्ते होणार आहे. 

डॉ. पी. डी. पाटील (कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ), भाग्यश्री पाटील (उपाध्यक्षा, डॉ. डी. वाय. पाटील विद्या प्रतिष्ठान सोसायटी), डॉ. स्मिता जाधव (विश्वस्त व कार्यकारी संचालक, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ), डॉ. एन. जे. पवार (कुलगुरू, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ), डॉ. ए. एन. सूर्यकार (कुलसचिव, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ), डॉ. जोस रुगे (शुद्ध धर्म मंडळ, ब्राझील), डॉ. सुभाष रानडे (अध्यक्ष, इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ आयुर्वेद, पुणे), डॉ. सुनंदा रानडे (उपाध्यक्ष, इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ आयुर्वेद, पुणे), डॉ. गुणवंत येवला (प्राचार्य, डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय). डॉ. बी. पी. पांडे (सल्लागार, डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय). डॉ. दिगंबर दिपंकर (आयोजन सचिव, डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय) आणि डॉ. मंदार बेडेकर हे परिषदेला उपस्थित राहणार आहेत. 

या परिषदेत देश-विदेशातील तज्ज्ञ डॉक्टर्स विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. त्यामध्ये डॉ. के. एस. धिमान (सीसीआरएएस, नवी दिल्ली), डॉ. श्रीराम सावरीकर (नवी दिल्ली), डॉ. जोस रुगे (ब्राझील), डॉ. एम. एस. बघेल व डॉ. अनुप ठकार (जामनगर), डॉ. रमेश भोंडे (पुणे), डॉ. एन. श्रीकांत (नवी दिल्ल्ली), डॉ. सुप्रिया भालेराव, रणजित पुराणिक (धूतपापेश्वर) या प्रमुख वक्त्यांचा समावेश आहे.

या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये शिक्षणतज्ज्ञ, व्यावसायिक डॉक्टर्स, पदव्युत्तर पदवीचे विद्यार्थी आयुर्वेदात केलेल्या संशोधनावर पेपर सादरीकरण व भितितीपत्रक सादरीकरण करणार आहेत. पहिल्या दिवसाच्या सांगतेवेळी परदेशातून आलेल्या मान्यवरांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ही आंतरराष्ट्रीय परिषद डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात होणार आहे. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZUWCF
Similar Posts
आयर्नमॅन स्पर्धेत डॉ. अभय लुने यशस्वी पिंपरी : येथील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे नेत्ररोग शल्य चिकित्सक डॉ. अभय लुने यांनी नुकतीच झुरिच (स्वित्झर्लंड) येथे झालेली ‘आयर्नमॅन २०१९’ स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. ही स्पर्धा पूर्ण करणाऱ्या आठ भारतीयांमध्ये त्यांनी तिसरा क्रमांक मिळवला.
कुस्तीपटू उत्कर्ष काळे यांचा डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाकडून सन्मान पिंपरी : डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थीरोग व क्रीडा चिकित्सा विभागाच्यावतीने क्रीडा चिकित्सा विषयावर एक दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त व ‘कॉमनवेल्थ गेम्स २०१७’मधील सुवर्णपदक विजेता कुस्तीपटू उत्कर्ष काळे यांना सन्मानित करण्यात आले. या वेळी महाविद्यालयाचे ट्रस्टी कोषाध्यक्ष डॉ
एचआयव्ही-एड्सवर व्याख्यान पिंपरी : येथील डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालयात स्वस्थवृत्त व योग विभागातर्फे एचआयव्ही-एड्स जनजागृती कार्यक्रमांतर्गत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
पिंपरी-चिंचवडमध्ये पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया पिंपरी : येथील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय रुग्णालय व संशोधन केंद्र येथे ‘डा विन्सीएक्सआय’ कंपनीचे अत्याधुनिक चौथ्या पिढीच्या रोबोटच्या साहाय्याने २५ जून रोजी नुकतीच पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यात आली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language